आयुर्विम्याच्या विक्रीसाठी एलआयसी-अॅक्सिस बँकेत सामंजस्य
आयुर्विमा योजनांच्या विक्रीसाठी बँका आणि विमा कंपन्यांतील आजवर सर्वात मोठे बँक अश्युरन्स सामंजस्य खासगी क्षेत्रातील तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या अॅक्सिस बँक आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीदरम्यान झाल्याचे गुरुवारी जाहीर करण्यात आले. अॅक्सिस बँकेच्या सर्व शाखांमधून एलआयसी पॉलिसींच्या विक्रीच्या या सामंजस्य करारावर उभय पक्षांकडून स्वाक्षऱ्या करण्यात आल्याचे गुरुवारी जारी करण्यात आलेल्या संयुक्त प्रसिद्धीपत्रकाने स्पष्ट केले.
दोन नामांकित व बडय़ा संस्थांनी केलेले अशा तऱ्हेचे सामंजस्य दोहोंच्या ग्राहकांच्या समाधानासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास एलआयसीचे बँक अश्युरन्स विभागाचे कार्यकारी संचालक मुकेश गुप्ता यांनी व्यक्त केला.
देशभरात ३,००० हून अधिक शाखा व विस्तार कक्ष असलेल्या अॅक्सिस बँकेने गेली पाच वर्षे आयुर्विमा पॉलिसींच्या विक्रीचा व्यवसाय दरसाल २५ टक्के दराने वाढत आल्याचे, अॅक्सिस बँकेच्या रिटेल बँकिंग विभागाचे प्रमुख राजीव आनंद यांनी सांगितले. एलआयसीसारखी प्रतिष्ठित विमा कंपनी भागीदार बनल्याने नजीकच्या भविष्यात हा वृद्धिदर आणखी मोठा असेल, असे त्यांनी सांगितले.
Good move by LIC
ReplyDelete